भारतीय संविधान हे जगातील महान संविधान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे. आज संविधान नसते तर देशात असमानता दिसून आली असती।
लोक आजही एकमेकांची गुलामी करत राहिले असते. भारतात अजूनही कर्मकांड मोठया प्रमाणात वाढले असते.आणि देशामध्ये अराजकता माजली असती,या सर्व गोष्टींचा अभ्यास करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची महान राज्यघटना लिहिली आहे,. आणि सर्वांना समान अधिकार देण्यात आले
पूर्वीच्या काळी चातुर्य वर्णीय व्यवस्था होती,ब्राम्हण,क्षत्रिय, वैष्णव आणि क्षुद्र असे चार वर्ण होते, त्यामुळे हे वरिष्ठ जातीचे लोक बाकीच्या लोकांना कमी समजायचे त्यांना गुलसासारखी वागणूक देत होते याचा बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला आणि सर्व जाती धर्माचा अभ्यास करून सर्वांना समान हक्क दिले,
भारतीय जनतेच्या गुलामीच्या बेड्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तोडून टाकले न्याय समता स्वातंत्र्य बंधुता , या मूल्याची अंमलबजावणी केली. आणि केवळ भारतीय संविधानामुळे आज देश खऱ्या अर्थाने प्रगती पथावर आहे.
आणि सर्वजण भरतात गुण्या गोविंदाने लोक रहातात. प्रत्येक व्यक्तीला थाट मानेने जगता येते फ़क्त संविधामुळे कारण त्यांनीच आम्हाला सर्व अधिकार हक्क आणि कर्तव्य बहाल केले आहे केवळ संविधानमुळे आमचे जगणे छान झाले आहे म्हणून अशा महान संविधानाला का म्हणून विरोध करायचे करायचे असेल विरोध तर कर्मकांडाला करा ,अंधश्रद्धाला करा ,कर्मठ रूढी परंपरेला करा, सतिप्रस्थेला करा, दहशतवादाला करा,
तरच देश खऱ्या अर्थाने प्रगती करील, म्हणून कधीही संविधानाला विरोध नको तर आपल्यातील वाईट प्रवृत्तीला विरोध करा,
आजकाल तर संविधानाची घरा घरात खूप गरज आहे म्हणूनच केंद्रीय शासनाने हर घर संविधान ही योजना राबविण्यात आली आहे कारण या संविधानातच आपल्या सर्वांचे भविष्य दडलेले आहे.
जय हिंद !जय भारत! जय संविधान!
लेखिका प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

