कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या गोदावरी विकास प्रतिष्ठानच्या फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या सातव्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन आमदार आशुतोष दादा काळे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांच्या उपस्थितीमध्ये 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पार पडला.
फार्मर्स डेन पब्लिक स्कूलचे चेअरमन पंडितराव चांदगुडे यांच्या निदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन झाले. या स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान पत्रकार परिषदही घेण्यात आली. चासनळी परिसरामध्ये फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून पालकांची इच्छा पूर्ण होत असून मुलांना दर्जेदार प्रकारचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत असल्याने पालकांमध्ये आनंदी व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये गावातील पालकांचाही व ग्रामस्थांचाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या स्नेहसंमेलनात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कला व डान्स या पद्धतीने ग्रामस्थांची व आलेल्या पाहुण्यांचे मने जिंकली. त्यावेळेस गोदावरी विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त रविराज चांदगुडे. युवराज चांदगुडे. माधुरी युवराज चांदगुडे. स्कूलच्या प्राचार्य अर्चना बोरावके व फार्मर्स डेन शिक्षक रुंद उपस्थित होते.

