शारदा विद्यालय येथे प्रतिपादन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – संत सेवालाल महाराज खरे समाज सुधारक होते. राष्ट्राला बळकट बनविण्यासाठी जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.
भेदभाव करू नका. सन्मानाने आयुष्य जगा .खोटे बोलू नका .स्त्रियांचा सन्मान करा. भुकेलेला अन्न द्या आणि गरजू लोकांना मदत करा. खऱ्या अर्थाने संत सेवालाल महाराज मानवतावादी विचारवंत होते. त्यांचे विचार देशासाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले .ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक आर. एम. हरडे होते.
कार्यक्रमाप्रसंगी बंजारा नृत्य कु.यशस्वी ओंकार नवखरे हिने सादर केले. आरुषी प्रल्हाद गाढवे आणि श्रावणी विजय मोहतुरे हिने बंजारा भाषेत संवाद साधला.अमन सोनवाणे, कुणाल वासनिक,विपशी बागडे,कादंबरी वैद्य,अथर्व धारंगे,चिन्मय भोयर,गुंजन बिसने,राशी साठवणे,लक्ष्मीकांत बाभरे आदींनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. लिझा दामोधर हेडाऊ आणि कु.माही महेंद्र मेश्राम हिने संचालन केले. गायत्री प्रभाकर मोहतुरे हिने आभार मानले. पर्यवेक्षक ज्योती बालपांडे,दिपक गडपायले,श्रीराम शेंडे,संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे,सीमा मेश्राम,प्रीती भोयर, विद्या मस्के,अशोक खंगार,अंकलेश तिजारे, अतुल भिवगडे, सुकांक्षा भुरे,बेनिता रंगारी,आरती पोटभरे, पुनम बालपांडे, लक्ष्मीनारायण मोहनकर,दीपक बालपांडे, झनकेश्वरी सोनेवाणे, उषा दाते, कल्पना मानकर, बंदिनी खैरकर,विद्या देशमुख आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

