प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – तरोडा सुंदरनगर येथील श्री. राम मंदिर साप असल्याचे एमएच २९ , हेलपिंग हैंडस च्या सर्पमित्र रमेश भादिकर यांना कॉल आला असता, ते विलंब न करता घटना स्थळी पोहचल्यावर तिथे भारतातील मुख्य चार विषारी सापा पैकी एक “फुरसे हा विषारी साप असल्याचे दिसले. त्याला योग्य रित्या पकडुन तेथील जनतेला माहिती देत
फुरसे हा भारतात सापडणाऱ्या व्हायपर कुळातील सर्वात लहान व विषारी साप आहे.
याचे आवडते खाद्य विंचू असून बऱ्याचदा विंचू खाताना फुरसे या सापाला विंचवाच्या दंशाचा सामना करावा लागतो.
पण विंचवाचे विष पचवण्याची शक्ती त्याच्या शरीरात असते.
विंचवाची संख्या कमी होत असल्यामुळे फुरसे या सापाची संख्या घटत आहे. कोकणात विंचवांची संख्या जास्त असल्याने तेथे फुरसे हा साप जास्त प्रमानात आढळतो.
इंग्रजी मध्ये SAW म्हणजे करवत आणि या सापाचे खवले करवती सारखे असल्याने या सापाला Saw Scaled असे म्हणतात असे कामगारांना सापाची माहिती देऊन जनजागृत केले. सापाची वणी येथील वनविभागा मध्ये नोंद करुन वनपरीक्षेत्र अधिकारी यांना दाखवून यांच्या मार्गदर्शनात निसर्गरम्य परिसरात सोडण्यात आले.
याचवेळी एमएच २९ हेल्पींग हंड्सचे वन्यजीव रक्षक रमेश भादीकर व राजु भोगेकर, अनिकेत कुमरे , नितीन माणुसमारे, समीर गुरनुले, संतोष गुमूलवार, दिवेंद्र भोगेकर, अमोल, रोहीत, दिपक, कुणाल, आशिष, दिनेश हे उपस्थित होते.

