परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शहर महानगरपालिका अंतर्गत असणारा प्रभाग क्रमांक 11 मधील विविध नागरी समस्या सोडविण्या संदर्भात आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील कायम दुर्लक्षित असलेला प्रभाग क्रमांक 11 मधील विविध नाल्या व रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे यामुळे प्रामुख्याने अब्दुल रहीम नगर, गाजिबा तूराबूल हक नगर, जमजम कॉलनी, हाजी अहमद कॉलनी या नगरामधील रस्त्यांची व नालींची अत्यंत दयनीय दुरवस्था झालेली आहे. तसेच बऱ्याच वस्त्यांमध्ये अजूनही पक्के रस्ते व नाली बनवले गेले नाही या कारणाने येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या अशी मागणी युवा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, युवा जिल्हाउपाध्यक्ष मुजफ्फर खान, परभणी तालुकाध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे,(उत्तर विभाग) युवा जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे, शेख अजहर, दीपक आनंदा, सय्यद जुनेद, मजर खान, अली यार खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

