केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे कामकाज करावे – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १८ जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली आज, दि. १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भांतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी मोलाची भुमिका बजावणार असल्याचे प्रास्तिविकात सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समिती बैठक आयोजित करण्यात आली असून योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भिवंडी व उल्हासनगर शहरांमध्ये स्वच्छते संदर्भात कामकाज करण्यासाठी आराखडा तयार करून आणि निश्चित केलेल्या कालावधीत कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के, खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा – सुरेश गोपीनाथ म्हात्रे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी किणीकर, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका प्रशांत रोडे, आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका (प्रभारी) अनिलकुमार पवार, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका मनिषा आव्हाळे, आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अनमोल सागर, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U), स्वच्छ भारत मिशन (SBM), अटल मिशन फॉर रिजूवेनेशन एंड अर्बन ट्रांसफोर्मेशन, स्मार्ट सिटी मिशन, सर्व शिक्षा अभियान (SSA), मिड-डे मील स्कीम या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि संचालनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के यांनी दिशा समिती मार्फत जलद गतीने कामकाज पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आणि केंद्र शासनाच्या ४५ योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा तर घरकुल शहरी तसेच ग्रामीण भागात वेळेत पुर्ण होण्यासाठी तांत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, असे मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिशा समिती काम करत असते आणि यासाठी दिशा समितीमार्फत नियंत्रण असणे गरजेचे आहे. जल जीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभागातील कामकाज वेगाने होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी पाठपुरावा करून कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा- सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी केले.
ठाणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या ४३१ ग्रामपंचायतींमध्ये भारत नेट प्रोजेक्ट व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन सेवा ग्रामीण भागात पुरविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, यासंदर्भात विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी मार्गदर्शन केले.
ठाणे जिल्ह्यातील वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय यांचे उद्देश निश्चित करून कामकाज वेळेत पुर्ण करण्यासंदर्भांत जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले तर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U) योजनेपासून कोणताही लाभार्थीं वचिंत राहणार नाही यांची दक्षता संबंधिंत विभागाने घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले.

