कोपरगाव मध्ये लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जनता दरबार भरविण्यात आला.

0
52

कोपरगाव तालुका प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
7744022677

कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे प्रशासकीय भवन पंचायत समिती येथे आमदार आशुतोष दादा काळे यांनी जनतेचे समस्या दूर करण्यासाठी जनता दरबार दर सोमवारी आयोजन केले आहे. या जनता दरबार मध्ये कोपरगाव पंचायत समिती सर्व विभाग. शासकीय पशु पैदास केंद्र वळू माता या विषयातील समस्या जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी बोलावून जनतेच्या समस्या समोरासमोर उभे करून सोडवण्यास आशुतोष दादा काळे यांना यश आलेले आहे. या जनते दरबारामध्ये घरकुलाचे विषय. कर्जाचे विषयी. व शासकीय सामाजिक विषय. यावर चर्चा होते. या जनता दरबारात एका महिलेने तक्रार केली की मला बेकरी टाकण्यासाठी ग्रामविकास अधिकारी ना हरकत दाखला देत नाही.त्या गावातील ग्रामविकास अधिकाऱ्याला आमदार साहेबांनी चांगला धडा शिकविला की लगेच ग्रामपंचायत इथून लेटर पॅड आणून दाखला देण्यात यावा.आज या जनते दरबारात अतिक्रमण विषयी समस्या मांडण्यात आल्या. या समस्येवर आमदार अशितोष दादा काळे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून विशेष माहिती जाणून घेतली. व यावर लवकरात लवकर विचार केला जाईल असे सांगितले. ग्रामपंचायत मधून व्यवसाय चालू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात यावा. व जनतेचा पैसा जनतेसाठीच काम यावा. व निष्काळजी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर निलंबित करू अशी आमदार आशुतोष दादा काळे यांनी जनता दरबारात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here