शिवशाही युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
50

सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नवरगाव येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२५, सोमवार रोजी शिवशाही युवा फाउंडेशन (टायगर ग्रुप), नवरगाव यांच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवटेकडी, नवरगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रमदान आणि वृक्षारोपण करून झाली. यानंतर झेंडावंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गोकुलदास वाडगुरे गुरुजी आणि मनोहर सहारे यांनी हजेरी लावली. तसेच शिवशाही युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सदस्यांचे कौतुक करण्यात आले आणि भविष्यातही असे समाजसेवी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here