
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 17/02/2025 सायंकाळी साडेपाच वाजे पासून कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात कंपनी बंद आंदोलन पुकारले आंदोलनादरम्यान दिनांक 18/02/2025 ला जिल्हाध्यक्ष- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) तथा विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष मा. प्रवीण लांडगे यांच्या नेतृत्वात, तसेच महा मिनरल्स मायनिंग अँड कोल बेनिफिकेशन व्यवस्थापन अधिकारी मा. रुगानी, संजय सराने, तसेच मानव संसाधन विभागां चे अन्य अधिकारी यांचे सोबत कामगारांच्या आरोग्य सुविधा, वेतन, सुरक्षात्मक धोरण, तसेच अन्य प्रलंबित मागणी विषयी, यशस्वी चर्चा करण्यात आली. चर्चेत प्रलंबित मागण्या तसेच त्याविषयी चे धोरण तत्काल लागू करण्याचे आदेश प्रबंधकानी दिले. सदर बैठकीस विजय क्रांती कामगार संघटनेचे कार्यालयीन सचिव- सतीश शेंडे, उपाध्यक्ष- प्रदीप ठाकरे, प्रदीप डाखोरे, मिलिंद ठमके, जावेद कुरेशी सह अन्य कामगार उपस्थित होते.














