सोनियाचा दिस उगवला
बाळ शिवाजी इथे जन्मला।
चंद्र कलेने वाढू लागला
शिवनेरी हर्षात रंगला।।१।।
सवंगडी हे मावळे झाले
जिजाऊंनी संस्कार केले
शिक्षणासाठी शिवबाच्या
दादोजीही गुरूजी झाले ।।२।।
चतुर बुद्धी होती त्यांची
मनगटात ही होती शक्ती
बाळ शिवाजी राजांच्या
डोक्यामध्ये होती युक्ती।।३।।
मुघल शत्रूला वेठीस धरले
इंग्रजाना पायी तुडविले
पाण्यामध्ये बांधून किल्ले
सळसळत्या पाण्यास आडविले ||४।।
शत्रूला जेरीस आणले
स्वराज्य त्याने निर्माण केले
रक्षण करण्या स्वराज्याचे
बाळ शिवजी राजे झाले।।५।।
स्वराज्याचे बांधून तोरण
त्यांनी आदर्श निर्माण केले
छत्रपती शिवाजी महाराज
कर्तबगार महान राजे झाले।।६।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

