लातूर प्रतिनिधी – लातूर कळंब रोड, रेल्वे गेट परिसरात अवैधरित्या दारु (हातभट्टी) विक्री होत असून यामुळे या भागातील नागरीकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन ये-जा करीत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागात अवैधरित्या दारु विक्री होत असल्याने अनेक लोकांचे संसार उध्दवस्त होत आहेत, हा प्रकार भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे याचे निदर्शनास आले असता त्यांनी एम आय डी सी. पोलीस स्टेशन माननीय निरीक्षक साहेब यांना निवेदन देऊन कळंब रोड, रेल्वे गेट या परिसरातील अवैधरित्या होत. असलेल्या दारु विक्रीस तात्काळ कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात. असे निवेदन देण्यात आले आहे तत्काळ कार्यवाही नाही झाल्यास भागातील नागरीका सह महिला व भिम आर्मी, लातूर जिल्हयाच्या वतीने आंदोलन, रस्ता रोको करण्यात येईल याची नोंद घ्यावी,.यावेळी भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष विलास चक्रे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे जिल्हा सचिव बबलू शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे हे निवेदन देते वेळी हजर होते उपस्थित होते.

