निफाड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज कवी कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्राचार्य सौ.सुनीता शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. सुनिता शिंदे यांनी केले संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उत्कृष्ट भाषणे केले. संस्थेतील कोपा व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी आकांक्षा टरले, निकिता काळे, मोहिनी जाधव, सुनील गोपाल, विजतंत्री व्यवसायाच्या जागृती रसाळ , सुशील शिरसाठ व प्रीती साळवे यांनी शिवाजी महाराजांवर उत्कृष्टपणे पोवाडा गायन केले. मेसन व्यवसायाच्या कुणाल जोशी व समाधान सोनवणे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर भाषण केली. कॉस्मेटॉलॉजी व्यवसायाच्या मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा पूजा खालकरन यांनी केली. राजमाता जिजाऊंच्या वेशात राजमुद्रा वाचन केले.
मधुरा बेंडकुळे व प्रीती साळवे यांनी राजमाता जिजाऊंना मुजरा केला. संस्थेच्या प्राचार्य सुस्मिता शिंदे यांनी मुलांना शिवाजी महाराजांचे विचार कशाप्रकारे जीवनात आणावे यावर मार्गदर्शन केले. यशवंत तेलोरे सर यांनी आदिलशाही मुघलांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे लढा दिला याविषयी मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील योगेश महाले यांनी केले.या कार्यक्रमाला संस्थेतील प्रियंका संगमनेरे, भरत निळे,संजय राजोळे,किरण सोनवणे, सचिन शिंदे, शिरीष भालेराव, मनोज जाधव ,पूजा जाधव व संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या प्राचार्या सुनीता शिंदे यांनी भाषण केलेल्या सर्व मुलांचे अभिनंदन केले.

