जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त अड्याळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्मारक अनावरण सोहळ्याप्रसंगी गुप्ता प्राथमिक शाळा च्या वर्ग १ ते ४ विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गीतावर लेझीम नृत्य सादर केले.
कार्यक्रमाप्रसंगी सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मानापुरे,ग्राम विकास अधिकारी पौर्णिमा साखरे , तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे , पोलीस पाटील प्रिया उराडे, छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष मयूर कोल्हे , भूषण लांबट व हर्षल पोटवार , संपूर्ण पदाधिकारी, गुप्ता प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेंगे , जयश्री हटवार , स्वाती भोवते , सहाय्यक शिक्षक नितीन वाणी , ग्रामपंचायत पदाधिकारी तथा कर्मचारी तसेच गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, गावातील सर्व उत्सव समितीची मंडळे प्रभात फेरी वेळी उपस्थित होते.विद्यार्थीनींसह उपस्थितांनी ‘जय भवानी… जय शिवाजी’ चा एकच जयघोष केला. यावेळी पदयात्रेत गुप्ता प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनींनी लेझीम नृत्य सादर केली.

