सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नवरगाव शिवशाही युवा फाऊंडेशन तर्फे नवरगावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तीन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिव टेकडी स्वच्छता,प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप, गावस्तरीय नृत्य स्पर्धा, गाव स्वच्छता, वेशभूषा स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करून बक्षीस वितरण फाऊंडेशन तर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच राहुल बोडणे,गोकुलदास वाटगुरे सर,सुशांत बोडणे, संजय बोडणे,पंकज उईके उपस्तिथ होते या कार्यक्रमास फाऊंडेशन चे अध्यक्ष गणेश ठाकरे, मोहित बावणे, सोहेल शेख, प्रणय मांदाळे व सर्व सभासद गण यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले,गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्यात सुंदर देखावे प्रदर्शीत करण्यात आले होते.

