
वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शेगाव (बु.) – वरोरा तालुक्यातील सालोरी, दादापूर, गुंजाळा, बोरगाव (भोसले), खेमजई, आसाळा, नांद्रा आणि वायगाव या आठ गावांमध्ये नाबार्ड अर्थसहाय्यीत कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर मार्फत मागील दोन वर्षांपासून वाडी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी तृणाल फुलझेले (DDM, Chandrapur) यांनी नुकतीच भेट दिली.
या प्रकल्पांतर्गत प्रति शेतकरी 112 रोपांची लागवड करण्यात आली असून, त्यामध्ये आंबा, सिताफळ, लिंबू व करवंद यांसारख्या फळझाडांचा समावेश आहे. रोपांचे संरक्षण करण्यासाठी सौर बॅटरी कंपाउंड देखील देण्यात आले आहे. एकूण 250 आदिवासी लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी
वाडी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास समिती स्थापन करण्यात आली असून, प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी निवडण्यात आला आहे. हा प्रकल्प आदिवासी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या दृष्टीने फळबाग आधारित नियोजनावर भर देत आहे.
प्रकल्प पाहणी व भेटी
यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी तृणाल फुलझेले यांनी वायगाव येथील रवींद्र गरमडे, गोपाल दडमल, विजय नन्नावरे यांच्या वाडीची पाहणी केली. तसेच, खेमजई येथील सुनंदा दोहतरे व रवींद्र चौधरी यांच्या वाडीचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान वाडी प्रकल्प समन्वयक भुमेश तांडेकर सर, प्रकल्प व्यवस्थापक संतोष गुजर, संस्था प्रतिनिधी आशिष अहिर, क्षेत्र पर्यवेक्षक रमेश चौधरी व नंदकिशोर ढोणे उपस्थित होते














