
“थिएटर ऑफ रेलेवन्स” शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत
नाटक : राजगती
लेखक आणि दिग्दर्शक : मंजुल भारद्वाज
राजगती हे नाटक राजकीय परिस्थिती बदलण्याचे सूत्र आहे. राजकीय नेतृत्वात आत्मबळ निर्माणासाठीचे विचारमंथन आहे. राजनीती घाण नसून मानवी कल्याणाची पवित्र निती आहे, हा उदघोष देऊन राजगती हे नाटक जनतेला राजकीय संभ्रमातून मुक्त करते आणि संविधानानुसार भारताचे मालक असण्याची ज्योत जागवते.
• कधी : 1 मार्च 2025, शनिवारी
• केव्हा : संध्याकाळी 5.30 वाजता
• कुठे : पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध, पुणे.
आस्था आपल्याला अंधकारात ढकलते पण आपला विवेक आत्मप्रकाशित करून दृष्टी निर्माण करतो. ही दृष्टीच एक सुंदर मानवीय जग घडवते. या मानवीय जगाला जगवण्याचे, टिकवण्याचे आणि संचालित करण्याचे भान राजनैतिक दृष्टी देते.
आपल्या या मानवीय जगाची संकल्पना आणि वास्तव यात खूप तफावत आहे. ही तफावत यामुळेच आहे कारण माणसांची जीवनदृष्टी आज संपली आहे.
दृष्टी नाही तिथे चेतना नाही.चेतना नाही तिथे विवेक नाही आणि जिथे विवेकच नाही तिथे योग्य आणि अयोग्य ची समजच नाही.
आजची परिस्थिती पहा, रोजगार हिसकावून घेऊन, ८० कोटी लोकांना निराधार केले आहे. लोकांना आस्थेच्या अंधकारात ढकलून मारणे आणि नंतर निर्लज्जपणे मृतांना मोक्ष मिळाला आहे असे घोषित करणे हा हिंदू राष्ट्राचा पुरावा आहे. लोक चिखलात आंघोळ करण्याला मुक्ती मानत आहेत. सरकार म्हणत आहे की, आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा देशद्रोह आहे.

जिथे संविधानाचे रक्षण करणारी न्यायव्यवस्था कोणत्याही पुराव्याशिवाय आस्थेवर आणि जनआस्थेवर आधारित निकाल देते, तिथे संविधान नष्ट करून हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात होते.
आज, विविधता, समता आणि सार्वभौमत्व या मूल्यांना एकाच धाग्यात गुंफणाऱ्या ‘संविधाना’ ला वाचण्याची गरज आहे. ज्या संविधानाच्या बळावर आज सत्ता उभी केली आहे, सत्ता आणि व्यवस्था आज त्यालाच खंडित करते आहे. जेव्हा सरकार स्वतःच ‘संविधान’ खंडित करते, तेव्हा देशाच्या मालकांना म्हणजेच सामान्य जनतेला ‘संविधानाचे’ संरक्षण करण्याची आवश्यकता असते. आपले संविधान आहे जे जनतेला देशाचा मालकी हक्क देते आणि मालक बनवते. देशवासीयांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की कोणतीच सत्ता त्यांना हा अधिकार देत नाही .
अशा काळात ‘थिएटर ऑफ रेलेवंस’ नाट्य सिद्धांत शनिवार 1 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित “राजगती” नाटक पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध, पुणे येथे प्रस्तुत करीत आहे.
जेणेकरून ‘राजकारण’ घाणेरडे आहे, राजकारण हे केवळ राजकीय पक्षां पुरतेच मर्यादित आहे, या चक्रव्युहाला भेदता येईल आणि लोकांना नागरिक बनवण्याची प्रक्रिया सुरू होईल!
आपले आयुष्य दर क्षणी ‘राजनीती’ ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक ‘सभ्य’ नागरिक असल्या कारणाने आपण केवळ आपल्या ‘मताचे दान’ करतो आणि आपल्या राजनैतीक भूमिकेपासून मुक्त होतो आणि मग दर वेळी राजनीतिला कोसत राहतो आणि आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती ‘वाईट’ आहे… चिखल आहे.. आम्ही सभ्य आहोत, राजनीति आमचे काम नाही, जर जनता प्रामाणिक आहे तर त्या देशाची लोकतांत्रिक राजनैतिक व्यवस्था भ्रष्ट कशी होऊ शकते?…चला, एक सेकंद विचार करूया, की खरंच राजनीति वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?…जरा विचार करूया की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठे लोकतंत्र चालू शकेल का… नाही चालणार… आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडे सत्ता जाणार आणि तेच घडतं आहे..
आपण सगळे अपेक्षा करतो की, ‘गांधी, भगतसिंग, सावित्री आणि बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज या देशातच जन्माला यावे पण माझ्या घरात नाही …चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थेला’ शुद्ध आणि सार्थक’ बनवू ! समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्य’ बदलण्याची चेतना जागवू, ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळाने’ प्रेरीत ‘राजनैतिक नैतृत्वाचा’ निर्माण होईल .
प्रत्येक भारतीयांमध्ये राजनीतिची विवेकी मशाल पेटवून आपल्या स्वतंत्रता सैनिकांनी देशाला ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त केले. पण काही सत्तालोलुपांनी ,सत्तेच्या दलालांनी ‘राजनीति घाण आहे’ या कलंकाला सुनियोजित षड्यंत्राने १४० करोड़ देशवासियांच्या मेंदूत रुजवले. ज्यामुळे सर्वसामान्य माणसांनी राजनीतिकडे पाठ फिरवली. राजनैतिक प्रक्रियेमध्ये कोणी सहभागी होतं आहे, तर ते फक्त सत्तालोलुप जे भांडवलदारांच्या बळावर वोट विकत घेऊन प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचे हनन करत आहेत. अस्मिता, प्रतिष्ठा अशा भ्रमित शब्दांऐवजी ‘सत्य, अहिंसा आणि संविधान’ हा भारताचे वैचारिक आणि तर्कशुद्ध कणा आहे !
आम्ही कलाकार समाजात परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन, जनतेची, सर्व सामान्य लोकांची दृष्टी बदलावी, राजनैतिक सहभागीता वाढीस लागावी आणि देश बदलावा व हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी हे “संविधान संवर्धन नाट्यजागर” साजरा करत आहोत !!
‘थिएटर ऑफ रेलेवंस’ नाट्य सिद्धांत शनिवार 1 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित “राजगती” नाटक पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध, पुणे येथे प्रस्तुत करीत आहे.
जेणेकरून ‘राजकारण’ घाणेरडे आहे, राजकारण हे केवळ राजकीय पक्षां पुरतेच मर्यादित आहे, या चक्रव्युहाला भेदता येईल आणि लोकांना नागरिक बनवण्याची प्रक्रिया सुरू होईल!
या नाटकाला आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेतून रंगमंचावर प्रस्तुत करणारे कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे, आरोही बाविस्कर हे आहेत.
चला संविधानसंमत विवेकशील भारताचा निर्माण करूया !














