नागपूर प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – बाळाचा वाढ विकास व ऊष्माघात,लहान मुलांचे वजन उंची वाढ व उष्माघात याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या
दिनांक २२ फरवरी २०२५ ला रामभाऊ म्हाळगी स्मृती शाळां म्हाळगीनगर ईंग्लिश मिडियम शाळा हुडकेश्वर नागपूर येथे पालक सभा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात बाळांचा वाढ विकास व वजन,उंची वाढ व उष्माघात यांविषयी वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांनी मार्गदर्शन केले.तसेच पोस्टर प्रदर्शनी लावली.डाॅ प्राजक्ता दमडू वैद्यकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांनी आताची जिवनशैली बद्दल माहिती दिली.पुर्विची जिवनशैली आणी आताची जिवनशैली मध्ये बदल झालेला आहे. म्हणतात जुन ते सोनं म्हणुन त्यांची सांगळ घालून आपणं आपलं जिवन जगल पाहिजे.
आपल खानपान बदलेल पाहिजे.तसेच योगा प्राणायाम मेडीटेशन करायला पाहिजे.घरातील वातावरण मुलांच्या वाढ विकास याला पुरक असायला पाहिजे.घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी.मुलांना आरोग्यदायी सवयी लावाव्यात व आपण पण त्या पाळाव्यात .मूलांचे खानपान, आरोग्य, यांवर लक्ष द्यायला पाहिजे.स्वच्छता साफसफाई, प्रत्येक वेळी हात धुणे, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपि करुन मुलांच्या आवडीनुसार पण ते सकस,संतूलीत आहार द्यावा.त्याचे कौशल्य शिकुन घ्यावे. जेवणाचे ताट हे कलर फुल असायला पाहिजे.एकत्र कूटूंबाने सोबत जेवन करावे.तसेच १००० दिवसांचे महत्व समजावून सांगितले.या काळामध्ये मुलांच्या मेंदुचा विकास हा ९०टक्क्यापर्यत होतो . म्हणुन त्यांची या काळात चांगली काळजी घ्यावी.जेणेकरुन चांगलें संस्कार होतील व आजची मुलं ही भावी पिढी आहे तर ती चांगली सुशीक्षीत , संस्कारित, हुशार होणारी असायला पाहिजे म्हणून मुलांची ती काळजी घेणे जरुरीचे आहे आणि त्यांची योग्य वयात वाढ विकास होत आहे की नाही हे बघायला पाहिजे व त्यावर उपाययोजना करायला पाहिजे..सामाजीक कार्य म्हणून आपण आपलं देहदान अवयव दान रक्त दान,नेत्र दान करावे ,त्याचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले.मुलांचे आईवडीलांचे कौन्सिंल केले.सर्वांना देहदान, रक्त दान, नेत्र दान, अवयव दान करण्याची शपथ दिली.व शेवटी सर्वांना खदखद हसवुन,टाळ्या वाजवून टेन्शन मुक्त जिवन जगण्याचा सल्ला दिला.सारिका बारापात्रे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सूषमा रंधये,मनिषा बारस्कर,अर्चना कोल्हे वंदना विनोद बरडे, डॉ प्राजक्ता दमडू यांनी मेहनत घेतली.२००पालकांनी सहभाग नोंदविला.सर्व पालकांनी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने पोस्टर प्रदर्शनी ला भेट दिली व सर्वांनी याबद्दल वंदना विनोद बरडे यांचें कौतुक केले व आभार मानले.

