
जगदीश वडजे नाशिक प्रतिनिधी 9175794502 – कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर येथे विद्यार्थी विकास मंडळांतर्गत आयोजित एकदिवसीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या उपक्रमांतर्गत ‘महिला सबलीकरण’ आणि ‘महिला कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर दिनांक २५/०२/२०२५ रोजी मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शक म्हणून उपस्थित मान्यवर श्रीमती प्रा. एस. एस. जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भारतीय इतिहासाची वाटचाल, त्याचा थोडक्यात वृत्तांत, पारंपरिक ते आधुनिकता/पुरुषसत्ताक ते आधुनिक समानता आणि या काळामध्ये कर्तबगार होऊन गेलेल्या महिलांचा उल्लेख करत. तत्कालीन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांच्या विश्वासाला आत्मबळ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी आपल्या कृतीतील काही प्रसंगांचे दाखलेही दिले…
तसेच, महिला कायदेविषयक जाणीव जागृती या विषयावर उपस्थित मान्यवर मार्गदर्शक श्रीमती ॲड. व्ही व्ही जाधव मॅडम यांनी पारतंत्र्यातील भारतीय व्यवस्था ते स्वतंत्र भारताचा विकास असे विवेचन करत, भारतीय संविधानिक/ राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे, मूलभूत हक्क याविषयी मार्गदर्शन केले व महिला सुरक्षा विषयक कायद्यातील सखोल विश्लेषण उपस्थित विद्यार्थींनीसमोर मांडले…
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एन. व्ही. गवळी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी:– प्रा. पासारे जी. एस. तसेच सर्व विभाग प्रमुख आणि सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहिले.














