जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502 – कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर, येथे विद्यार्थी विकास मंडळांतर्गत आयोजित *”करिअर गायडन्स”* दिनांक २८/०२/२०२५ रोजी मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात आला.
आजच्या करिअर गायडन्स या उपक्रमास लाभलेले मार्गदर्शक अग्निपंख अँकॅडमी ता. दिंडोरी येथील मान्यवर श्री. एस. डी. वानखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना 10 वी/ 12 वी आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्वतःचे करिअर घडवण्याची नवनवीन संधी जसे की, स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC पोलिस भरती, सरळ सेवा भरती, ई. क्षेत्र; विषयावर मार्गदर्शन करून, जिद्द आणि चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाळगले तर प्रत्येक विद्यार्थी आपले भविष्य उज्वल करू शकतो. असे करिअर गायडन्स या विषयावर स्वप्नधेय्य नियोजनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एन. व्ही. गवळी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी:– प्रा. पासारे जी. एस. तसेच सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

