जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502 – कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर येथे विद्यार्थी विकास मंडळांतर्गत आयोजित “निर्भय कन्या अभियान” कार्यशाळा संपन्न झाली. या उपक्रमांतर्गत एक दिवसीय कराटे प्रशिक्षण दिनांक २८/०२/२०२५ रोजी मार्गदर्शनपर कार्यशाळा राबविण्यात आला.
आजच्या कार्यशाळेस लाभलेले मार्गदर्शक/प्रशिक्षक मान्यवर श्री. जाधव आर. बी.(Martial Art) आणि श्री. मोसीन मणियार सर व सोबत त्यांचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना *”कराटे ही स्व-संरक्षणाची एक अत्यंत प्रभावी प्रणाली आहे.” आणि व्यायामाचा एक उत्कृष्ट प्रकार ही आहे. जो मानवी जीवनातील अनेक जीवन कौशल्ये आणि मूल्य यांना प्रोत्साहन देतो.* तत्कालीन काही सामाजिक प्रसंगांचे उदाहरण देऊन कराटे प्रशिक्षणाचे तत्कालीन जीवनात असणारे महत्त्व विश्लेषण करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कराटे प्रशिक्षण आधारित श्री. जाधव आर. बी. सर व मोसिन मणियार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एन. व्ही. गवळी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी:– प्रा. पासारे जी. एस. तसेच सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहिले.

