प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ७६२०२०८१८०,९८६०९१००६३ – कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी कैलास पवार यांनी आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी घरकुलाच्या मागणीसाठी अर्ध नग्न आंदोलन ढोल वाजवीत केले कैलास पवार यांच्या म्हणण्यानुसार 2005 पासून आम्हाला घरकुल नाही कारण आम्हाला ग्रामपंचायत ने अद्यापही जागा दिलेली नाही आम्ही आदिवासी कुटुंबातील असून रोजंदारी करून उदरनिर्वाह करतो कसेबसे जीवन जगतो जागा घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा असा पैसा नाही त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील मी ज्या जागेत राहतो तेथेच मला घरकुल द्यावे जागे अभावी मला घरकुल मिळत नाही म्हणून नाईलाजाने मला आज अर्धनग्न आंदोलन ढोल वाजवीत करावी लागली या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी पुरेपूर असे सहकार्य केले बीडिओ साहेबांच्या आश्वासनानंतर अर्ध नग्न आंदोलन मागे घेतले

