तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी जि.प.उ.प्रा. शाळा आष्टा येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनी व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य.स.चे अध्यक्ष मा. हरिश्चंद्र कारमेंगे होते, तर उद्घाटन विस्तार अधिकारी सौ. कल्पना सिद्धमशेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मा. संजय साळवे (आष्टा), केंद्रप्रमुख मा.विद्ये (मुधोली), शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कु. दुर्गा कारमेंगे, प्रतिभा आत्राम तसेच उपसरपंच अहीरकर उपस्थित होते.
शाळेतील १ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध संकल्पना दर्शविणाऱ्या *एकूण ५५ विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट विज्ञान मॉडेल्समुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत झाली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शाळेतील कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

