पाककृती स्पर्धेनी अनेकांचे मने जिंकली

0
52

न. प. गुरुदेव बिसने प्राथमिक शाळेत केंद्र स्तरीय स्पर्धा संपन्न

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – प्रधानमंत्री पोषण योजने अंतर्गत केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा नगरपरिषद P M.श्री. न.प.गुरुदेव बीसणे प्राथमिक शाळा तुमसर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पोषण आहार मध्ये समाविष्ट सर्व शाळांनी भाग घेतलेला होता.

त्यामध्ये प्रथम क्रमांक नगरपरिषद मालवीय प्राथमिक शाळा तुमसर आरती आनंद चाचेरकर मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक नगरपरिषद गांधी प्राथमिक शाळा तुमसर,नसीहा चंद्रिकापुरे यांनी पटकाविला. सर्व शाळेने अप्रतिम अशा आरोग्याला पौष्टिक वस्तूचे प्रदर्शन केले होते.तुमसर शहरातील न. प.गुरुदेव बिसने प्राथ शाळा, न. प. माधोराव उच्च प्राथ.शाळा, न. प.रामजी गणेशा, न. प. बांगळकर,शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर, जनता विद्यालय,तुमसर, भारती कन्या शाळा,तुमसर. श्री शिव छत्रपती प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकाश बामन व आभार प्रदर्शन अविनाश गजबे यांनी मानले.पंचायत समिती परीक्षक शुभांगी सार्वे, रहांगडाले विषय तज्ञ, बिसेन, गायधने, सुनील वाडीभस्मे यांनी केले. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे होते. एफ. बी. फूड,एस.बी. रायकवार, रुपाली सुधीर देशमुख, आशा बुराडे, नीलिमा मेश्राम, संगीता कापसे, मुख्याध्यापक इंदिरा पडोळे आदी मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here