प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मन मंथन लेखन- वाचन समूह विविध साहित्य कृतींचा, मनस्वी साहित्यिकांचा मनभावन समूह आहे. वर्षभर सर्व साहित्य कला विधांचे उपक्रम घेऊन प्रत्येक समूह सहभाग्यांचे साहित्य विधा निर्मिती करता मार्गदर्शन केले जाते. संचालिका प्रेरणावाडी, उप-संचालिका वंदना पांडे यांच्या व्यासंगी कल्पनेतून, कोवीड काळात जन्मलेले बाळसेदार बाळ, आता चांगलेच गुटगुटीत झाले.
दि.२४-२५-२६ फेब्रुवारी २०२५ ला विदर्भातील, नागपूर येथील पारशिवनीतील “माहुली कृषी पर्यटन” येथे “बाबा आमटे साहित्य नगरी”, “राम गणेश गडकरी सभा मंडपात” संमेलन अत्यंत दिमाखात, आगत्यपूर्ण सन्मानात सुसंपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनेक पुरस्कार प्राप्त साहित्यिका प्रा. दिपाली सोसे, प्रमुख पाहुण्या, सुप्रसिद्ध लेखिका, साहित्य शिरोमणी, वर्षा देशपांडे, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय लेखिका, वैद्य माधुरी वाघ सोबत संस्था संचालिका प्रेरणावाडी, उपसंचालिका वंदना पांडे, अतिथी- सतीश सोसले, विजय देशपांडे, प्रदीप वाडी, सतीश शिरसाट, रश्मी कुलकर्णी, मंजुषा विश्वेकर, विनोद मुळे,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
२४फेब्रु.ला, परिचय सत्रात, वनवन्हीचे विविध मनोरंजक क्रीडा कार्यक्रम, अध्यक्ष श्रीकांत विश्वेश्वर, प्रमुख पाहुणे प्रकाश टिकेकर व संदीप कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वीणामुळे यांच्या निवेदनाने संपन्न झाले.
२६ फेब्रु.ला सकाळी ध्वजारोहण, ग्रंथ पूजन, ग्रंथ दिंडी पालखीचे भोई, टाळ-टिपऱ्या, फुगड्यांच्या जल्लोषात संपन्न होऊन, दीपप्रज्वलन, सरस्वती पूजनाने उद्-घाटन संपन्न झाले. नंतर अभिजात मराठीच्या “मायबोली शब्द गौरव”, संस्थेची स्मरणिका ‘शब्द फुलांची ओंजळ’ व कवियत्री प्रेरणावाडींच्या, “चित्ररंग, काव्यसंग” या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. वर्षभर घेतलेल्या नानाविध साहित्यिक उपक्रमांच्या विजेत्यांचे सत्कार, मनमंथन लेखन- वाचन समूहाच्या पदाधिकाऱ्यांचे सन्मान करण्यात आले. याप्रसंगी निवेदन शुभांगी तिवारी, मंजुषा विश्वेकर, नंदिनी खाडे, अर्चना गिरगांवकर, मीरा घोंगे, तर आभार प्रदर्शन अलका टिकेकर यांचे होते.
मध्य समय भोजनानंतरच्या सत्रात “साहित्य कट्टा” कार्यक्रमात साहित्यातील विविध कलांचे सादरीकरण, अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे, प्रमुख पाहुणे विष्णू पांडे, चंद्रकांत तुंगार यांच्या उपस्थिती झाले. निवेदन शुभदा साधू, रश्मी देवगडे तर स्मिता रेखडे यांनी आभार प्रदर्शन केले.
संध्या सत्रात विविध कलाविष्कार, अध्यक्ष चंद्रकांत जुन्नरकर, प्रमुख पाहुणे मोहन घोंगे, माधव गिरगांवकर यांच्या उपस्थितीत, मनमंथनच्या निवडक सदस्यांनी सादरीकरण केले. सर्वांचा प्रतिभाग अतिशय विलोभनीय, आकर्षक, मनोवेधक होता.
रात्री सर्वांनी स्वरूचि सहभोजनाचा आस्वाद घेतला.
२६ फेब्रु.ला संमेलनात निरोप- सांगता समारंभ, अतिशय जिव्हाळ्याच्या, आनंदाश्रूंच्या ओलाव्यात, पुन्हा भेटीसाठी मार्गस्थ झाला.
तीनही दिवस,पुणे मुंबई, सातारा, अकोला, कल्याण, अमरावती, हिंगणघाट, नागपूर येथील सभासद समूह संचालिका प्रेरणावाडी, उपसंचालिका वंदना पांडे, स्वागताध्यक्ष रश्मी कुलकर्णी, उपस्वागताध्यक्ष मंजुषा विश्वेकर, संमेलन प्रमुख प्रतिमा तुंगार, संमेलन प्रमुख अलका टिकेकर, सचिव मीरा घोंगे, उपसचिव रेखा भिवगडे, कोषाध्यक्ष विनोद मुळे, रेखांकन- चित्रकृती-प्रमुख प्रदीप वाडी, चंद्रकांत तुंगार, श्रीकांत विश्वेकर, संदीप कुलकर्णी,व अन्य उपस्थित होते. सर्वांनी संमेलनाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य करून अतिशय सुंदर सोहळा संपन्न केला.

