माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय विलास विखार यांचा भाजपमध्ये प्रवेश
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
ब्रम्हपुरी प्रतिनिधी /मयुर देवगडे: तालुक्यात सध्या एक मोठा राजकीय उलथापालथ घडत आहे. काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या माजी नगर परिषद गट नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये प्रवेश करण्यात आले. विलास विखार आज ४ मार्च रोजी मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश होणार झाले. तसेच त्यांच्या सोबत युवा उद्योजक गौरव भैय्या,माजी पंचायत समितीचे सभापती नामदेव लांजेवार, डॉ. सतीश कावळे,सुरेश दरवे, तसेच शेकडो कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश केले विलास विखार यांच्या काँग्रेसला अलविदा केल्याने ब्रह्मपुरीतील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. नगर परिषद ब्रह्मपुरीत विलास विखार यांच्या नेतृत्वाखाली सलग सत्ता होती, परंतु आता भाजपामध्ये गेल्यामुळे नगर परिषद मध्ये भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. याचा काँग्रेसला गंभीर फटका बसणार आहे. काँग्रेसच्या पक्षव्यवस्थेला लागलेला हा खिंडार भविष्यात आणखी गडद होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विलास विखार यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाच्या खंडणीचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचे भाजपात प्रवेश करणे निश्चित असल्याचे सूचित केले जात आहे असून आणखी मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ब्रह्मपुरीतील काँग्रेसला यामुळे पक्षांतराचा मोठा फटका बसणार आहे. विशेषतः या बदलामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तणावपूर्ण होणार आहे.
काँग्रेसच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यामुळे तालुक्यातील आगामी राजकीय लढाईत भाजपाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात, काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या आणखी नेत्यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच चिखल उडणार असून, भाजपाच्या वर्चस्वाची शक्यता अधिक दृढ होत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला पुढील काळात मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे.पक्षप्रवेश्याचा वेळेस चिमूर चे आमदार बंटी भांगडिया, आरमोरी क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे व इतर भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते.

