गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन!

0
35

‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रम ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ने सन्मानित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमाला भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंग श्रेणीतून ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांनी आज फिक्की फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे स्विकारला.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम माओवादग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 3 मार्च 2023 रोजी ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रम सुरु करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी या सर्व आयामांचा विचार करुन ‘प्रोजेक्ट उडान’ची आखणी करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा गडचिरोली पोलीस दलाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गडचिरोली नक्षलवाद नाकारत आहे, गडचिरोली बदलत आहे, याचेच हे द्योतक आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here