कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील देशी दारू दुकानावर अज्ञात चोरट्याचा कहर.

0
87

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – संपूर्ण माहिती अशी की रविवार दिनांक 2 मार्च रोजी दहा वाजेनंतर व दिनांक 3 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत चासनळी येथील देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने केला कहर . या दुकानांमध्ये ठेवलेले 180 मिली चे प्रिन्स संत्रा कंपनीचे ते 33 बॉक्स. साधारण त्या बॉक्समध्ये 48 बॉटल असतात. सध्याच्या बाजारभावानुसार या बॉक्सची किंमत 1 लाख 10 हजार 880 असून तसेच 90 मिली प्रिन्स संत्राचे 6 बॉक्स चोरीला गेले .या प्रत्येक बॉक्समध्ये 100 बाटली असतात. याचा बाजारभावानुसार 21 हजार रुपये आहेत. हा सर्व माल 1 लाख 31 हजार 880 चा असुन अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेला आहे. व तसेच याबाबत कोळपेवाडी येथील राहणारे परसराम नारायण सुद्धाला यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये 56/2025 भारतीय न्याय चे कलम 305-(4)-305 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून. अज्ञात चोरटे यांचे व्हिडिओ व फोटो सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेले आहे. तरी अजून त्यांची ओळख पटलेली नाही. पुढील घटनेचा तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोहटे साहेब हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here