तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दिनांक – 3 मार्च 2025 इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर 303, अध्यक्षा सुचिता जेऊरकर, सचिव पल्लवी तेलंग आयोजित विशेष कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष जयश्री पोफळे यांच्या उत्साहपूर्ण स्वागताने झाली. या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या कपडा बँकेत गरजूंसाठी कपडे, पुस्तके आणि आवश्यक वस्तू दान करण्यात आल्या. त्यानंतर, पठाणपुरा येथील प्राथमिक शाळेच्या तुटलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी मदत करण्यात आली, ही सुविधा उत्तम ब्रिक्स यांनी पुरवली.
यानंतर, जिल्हाध्यक्ष जयश्री पोफळे यांना चंद्रपूरच्या आराध्य देवी महाकाली मातेच्या दर्शनासाठी नेण्यात आले. मुख्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात आले आणि क्लब एडिटर मनीषा लांबट यांनी गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन किरण आवळे आणि रिंकू सुराणा यांनी केले.
कार्यक्रमात नवीन सदस्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. क्लब अध्यक्षा सुचिता जेऊरकर, सचिव पल्लवी तेलंग, कोषाध्यक्षा अर्चना उचके, ISO भारती छाबरा आणि CC तृप्ती चिद्रावार यांनी क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली. माजी अध्यक्षा राखी बोराडे यांनी Inner Wheel Club 303 च्या जिल्हाध्यक्ष जयश्री पोफळे यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
जयश्री पोफळे मॅडम यांनी क्लबच्या समाजसेवेचा गौरव केला आणि आपल्या प्रेरणादायी संवादाने उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे क्लबच्या कार्याला नवीन ऊर्जा मिळाली.
यावेळी हिना भगत या गरजू महिलेला शिवणयंत्र प्रदान करण्यात आले, जेणेकरून ती स्वावलंबी बनू शकेल इनरव्हील क्लब 303 जिल्हाध्यक्ष जयश्री पोफळे यांच्या हस्ते क्लब बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले.
OCV मीटिंगमध्ये – क्लब 303 च्या DVC रमा गर्ग,स्मार्ट सिटी क्लबच्या अध्यक्षा उमा जैन, चांदा फोर्ट क्लबच्या PDC वर्षा कोतपल्लीवार क्लब अध्यक्षा मंजू भास्करवार आणि सचिव अश्विनी राघूषे उपस्थित होत्या.
तसेच, रोटरी क्लबचे सचिव मिलिंद बोडखे यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात Inner Wheel Club of Chandrapur च्या अनेक सदस्यांनी सहभाग घेतला
कार्यक्रमाच्या शेवटी, उपाध्यक्षा अंजली उत्तरवार यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण दिवस समाजसेवेचे विविध उपक्रम आणि प्रेरणादायी संवादाने भरलेला होता.कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

