हरदोली येथे बुद्धवासी चंदन महादेव गजभिये यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिवस संपन्न

0
65

मोहाडी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. मोहाडी तालुक्यातील हरदोली येथे बुद्धवासी चंदन महादेव गजभिये यांच्या प्रथमच पुण्यस्मरण दिवस दि. 05/03/2025 बुधवार रोजी सायंकाळी 8 ते12 पर्यंत आयोजित केला.
यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले, यावेळी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम, शाहीर रमेश रामटेके, शंकर मोतकर, दिलीप मेश्राम, शाहीर गणेश मेश्राम, अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, गायिका वर्षा गाढवे, गायिका उषा मेश्राम, विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, कार्यक्रमाचे आयोजक राजेश गजभिये, राहुल गजभिये, इत्यादी गावातील नागरिक गायक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here