जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रशासनातील कार्यरत विविध विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी कामात अनियमितता बाळगत असल्याच्या तक्रारी होत्या. काही कामांमध्ये अनियमितता तर काही नेत्यांच्या आशीर्वादाने बुट्टी मारत असल्याचे दिसून येते. काही नाहक दौरा दाखवून कार्यालयात सतत गैरहजर असल्याने लोकांची कामे होत नसल्याने पायपीट होत असल्याच्या तक्रारी होत्या. वास्तविक स्थिती जाणून घेऊन अनेक वर्षापासून कुंडली मारून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेरबदल करून अनेक वर्षापासून ग्रामीण भागात काम करणाऱ्यांना शहरात संधी देण्यासाठी उपाययोजना करावे की काय यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.कविता जगदिश उईके यांनी जिल्हाभर आकस्मिक दौरा करून गैरहजर कर्मचारी व जिल्हा परिषदअंतर्गत मंजुर कामात झालेली अनियमितता याची पाहाणी करून तशी नियमाप्रमाणे कार्यवाही करू असे कविता उईके यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासकीय नियंत्रणासाठी ताफ्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र धारगांव येथे भेंट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली व रूग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याकरीता वैद्यकीय अधिकारी यांना सुचना दिल्या.कोणत्याही तक्रारी झाल्यास कार्यवाही करणार असल्याची सूचना दिल्या
लाखनी पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना फटकारले
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा व त्यांचा ताफा लाखनी पंचायत समिती येथे आकस्मिक भेट दिली असता गटविकास अधिकारी व विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाच्या विविध योजना व सवलती देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी निस्वार्थपने सहकार्य करुन कर्तव्याचे पालन करावे. जनतेच्या समस्या व तक्रारी जिल्हा कार्यालयात येणार नाही याची काळजी घ्यावी . विविध विषयासंदर्भी चर्चा करून संबंधित विभागा मध्ये कर्मचारी उपस्थित आहेत की नाही यांची पाहणी केली. कोणत्याही राजकीय भ्रमात जाऊन कर्तव्यात कसूर करून बुद्धी पुरसर कार्यालयात गैरहजर राहू नये कर्तव्याचे पालन करावे.तसेच बांधकामातील अनियमितता व गैव्यवहारप्रकरणी कोणालाही सोडणार नाही म्हणून फटकारले .
प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा येथे आरोग्य सेवा तपासणी.
लाखनी तालुका येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा येथे भेंट दिली असता वैद्यकीय सेवा सुविधा योग्य त्या प्रमाणात पुरविल्या जातात की नाही.ती तपासणी करून योग्य प्रकारे आरोग्य सुविधा दिल्या जातात की नाही ते तपासून रुग्णाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसुन आले. सदर भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात यावे व रुग्णांना आरोग्य सेवा चांगली देण्याचे निर्देश उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
तसेच आरोग्य केंद्राची स्वच्छता व निघराणी राखण्याचे आदेश दिले.
या आकस्मिक दौऱ्याने बाहेगावाहून येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना चांगला धसका बसला असल्याचे दिसून येत आहे.

