महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विदर्भ उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांची नियुक्ती

0
47

शारदा भुयार वाशिम महिला जिल्हा प्रतिनिधी – वाशिम : पत्रकारांच्या सर्वांगीन न्याय्य हक्कासाठी लठणाऱ्या,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्रचना करण्यात येत आहे शिवाय लवकरच वाशीम जिल्ह्यात पत्रकार संघाचे महाअधिवेशन होणार असून त्यानिमित्ताने,प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमाणी यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत,मुंबई येथील संघटक संजयजी भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकोडे,प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमाणी,प्रदेश सरचिटणिस विश्वासराव आरोटे यांच्या मान्यतेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर विदर्भ प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त्या करण्यात येत आहेत.त्याच अनुषंगाने आणि विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे,विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी यांचेशी झालेल्या चर्चे नंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विदर्भ कार्यकारिणी मध्ये “विदर्भ उपाध्यक्ष” म्हणून कारंजा (लाड) येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून दि. ०५ मार्च २०२५ रोजी कारंजा येथे झालेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमाणी, विदर्भ कार्याध्यक्ष अभयजी खेडकर,अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी इत्यादींचे हस्ते त्यांना विदर्भ उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देवून गौरविण्यात आले.यावेळी बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.उल्लेखनिय म्हणजे इ.सन १९८७ पासून अगदी विद्यार्थी असतांना बाल्यावस्थेपासून कारंजातील दिवंगत सुप्रसिध्द पत्रकार स्व.दादा पिंजरकर,स्व. सुधाकरजी नाफडे, स्व.नागेश कुळकर्णी,स्व.जुगलकिशोरजी शर्मा यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने वास्तववादी पत्रकारीता करणारे,संजय कडोळे यांची पत्रकारीतेमध्ये अनेक दशकांचीच नव्हे तर कित्येक वर्षाची निष्काम सेवा झालेली आहे.त्यांनी अनेक वृत्तपत्रामधून पत्रकारीता,स्तंभलेखन, संपादकिय लेखन,ललित, कविता,कथा लेखन केलेले असून त्यांनी लिहीलेले अनेक लेख यापूर्वी देशोन्नती, महासागर,नागपूर पत्रिका इत्यादी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहेत.शिवाय त्यांनी कारंजा येथील महाविद्यालयामधून पारिजातक भित्तीपत्रक, ज्ञानगंगा अनियतकालिक, साप्ताहिक जरकारंजे वृत्तपत्र अनेक वर्ष निःस्वार्थ वृत्तीने प्रसिद्ध केले असून प्रातिनिधीक स्वरूपात काव्यसंग्रहाचे आणि पं.नेहरू आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात स्मरणिकांचे प्रकाशन केले आहे. सध्या पत्रकारिता जगतामध्ये त्यांचे साप्ताहिक करंजमहात्म्य वृतपत्र यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. धार्मिक,आध्यात्मिक, लोककला,सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान असून त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरिय – राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन २०१९ मध्ये तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले यांचे हस्ते गौरविण्यात आले होते. शिवाय सामाजिक कार्यात सेवाव्रती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय कडोळे यांनी लोककलावंत व दिव्यांग सेवेकरीता तनमनधनानी स्वतःला समर्पित केलेले असून त्यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेद्वारे केलेल्या दि . २४ जानेवारी २०२४ च्या विराट धरणे आंदोलनाची दखल घेऊन सांस्कृतिक कार्य विभागाने, वृद्ध कलावंताचे मानधन २२५०/- वरून ५०००/- दरमहिना सुरु करीत वृद्ध कलावंताना दुपटीने भरीव वाढ मिळवून दिली आहे. त्यांच्या याच निष्काम सेवेच्या फलस्वरूप प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमाणी यांनी थेट त्यांची पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर वर्णी लावली असून त्याबद्दल संजय कडोळे यांनी नम्रतापूर्वक पदाचा स्विकार करून,आपण दिलेली जबाबदारी स्विकारून,सर्व लहानमोठ्या पत्रकाराचा सन्मान करून,त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढून,मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या नियुक्तीची वार्ता कळताच वाशिम येथील शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक,कारंजाच्या आमदार मायमाऊली सईताई डहाके, विजय मनवर, शेषराव मेश्राम, प्राचार्य डॉ के बी देशमुख,गणेश लहाने, देवव्रत डहाके, कारंजाचे पत्रकार सुनिल फुलारी,अभय खेडकर, प्रफुल बानगावकर, किरण क्षार, लोमेश चौधरी, मोहम्मद मुन्निवाले,आरिफ पोपटे, उमेश अनासाने, प्रदिप वानखडे, रोहित महाजन, गोपाल कडू, दिलीप पाटील रोकडे, एकनाथ पवार, विलास राऊत, विजय खंडार, अमोल अघम, समिर देशपांडे, नितीन वाणी, हफिज खान, विजय गागरे, चांद मुन्निवाले आदींनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे. तसेच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध संघटना व्यक्तीविशेष चाहत्यांकडून संजय कडोळे यांचेवर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here