prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई

0
92

आई तू फुलातला मधुकण
अन् दरवळणारे सुगंधी क्षण
पावसातली हिरवळ
सर्वांना आवडते जशी
आई तू मला हवीहवीशी

आई तू टपोरे चांदणे बिलोरी
तू सोनरंगी प्रभात रूपेरी
तूच निसर्ग हिरवा गर्द
तू माझ्या ह्रदयातील स्पद

तू वसंतातला नवतरंग
बहरलेल्या जिवनाची बाग
तुजविन दिशा सुन्या दाही
आई तूच माझे सर्वकाही

वैशाली वागरे – भुक्तरे
पालीनगर नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here