प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई म्हणजे

0
75

आई म्हणजे माहेर असतं
कितीही रागावली ओरडली तरी
मायेच्या ओलाव्याचे घर असतं
रात्र असो किंवा दिवस असो
पील्लांसाठी दार उघडच असतं
काय हवं नको आईकडे मागता येत
दुखलं खुपलं आईला सांगता येत
आई म्हणजे जखमेवरच मलम असतं

तिच्या डोळ्यांतली दाट माया
आपल्यासाठी पाण्याचं सरोवर असतं
आई म्हणजे आपला हक्क असतो
आईपाशी केव्हाही भांडता येत
वाईट गोष्टी पासून आपलं रक्षण करणारं
ते एक अभेद्य अस कवच असतं
शब्दांतून व्यक्त करता न येणारं
देवाचच दुसरं रुप असतं

आपली आई गेल्यानंतर मात्र
आपलं माहेर दारापाशी थांबत
आपल्या मनातलं दुःख सांगायला
हक्काचं असं स्थान नसतं
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही
आई हे एक अढळपद असतं
आपल्याला आई गेल्यानंतर कळतं
आई इतकं मौल्यवान जगात काहीच नसतं

गुलाब अनिल वेर्णेकर:गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here