
मी होती साधी भोळी
दुनियादारी नव्हती कळली
शब्द ना येती ओठांवरती
वादळे होती मनात किती//
मन म्हणाले किती सोसती
चल उठ बदल स्वतःला
बघ किती काळ बदलला
तू का घातले बंधन स्वतःला//
मन हे उडती वाऱ्या संगे
जणू लाट जशी सागरा वरती
पक्षी होऊन घे भरारी
बदल स्वतःला ने शिखरावरी//
नारी तू शक्ती शाली
जशी विर झाशीची राणी
तुला न म्हणती अबला कोणी
वीरांगना तू माय माऊली//
सौ.वैजयंती विकास गहुकर
योगा टीचर जिल्हा चंद्रपूर















