
आयुष्याच्या लघुपटावर
जिंकलीस तू ग नारी
शिकूनी सुशिक्षित झालीस
दिसे नवरूप तुझे घरोघरी …..
संसाराची बाग फुलवून
घेतले तू खांद्यावर
प्रशासकीय सेवेचे ओझे
भूषविली मानाची पदे खुर्चीवर …..
उंच भरारी घेऊनी
अंतराळात चमकली
शौर्यापुढे भीती तुझ्या
मनी कधी ना दाटली ……
आव्हानेही खूप स्वीकारली
जिजाऊचे संस्कार नाही विसरली
सैनिक निर्माण करुनी
तू देशासाठी वाहिली …..
धन्य आहे तू ग नारी
कीर्ती व्यापली जगभरी
राष्ट्रपती पंतप्रधान बनुनी
देशाची प्रतिमा उंचावली ….
दैदिप्यमान यश तुझे
सावित्रीच्या अस्तित्वाने
पंखात बळ आले
तिच्या संघर्षमय त्यागाने …..
संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ















