prabodhini news logo
Home ठळक बातम्या जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज पदभार स्वीकारला

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज पदभार स्वीकारला

0
191

अहिल्यानगर प्रतिनिधी – अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आज यांनी आपला पदभार स्वीकारला प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार स्वीकारण्यास आपले अनुमोदन दिले डॉक्टर आशिया हे २०१६ च्या तुकड्याचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. अहिल्यानगर येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यापूर्वी डॉक्टर आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते डॉक्टर आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परीवीक्षाधीन कालावधीतआर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार व बाबुळगाव येथे गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here