कोपरगाव प्रतिनिधी – दिनांक 9 मार्च 2025 रोजी भा.क.पक्ष कार्यालय अहमदनगर येथे संघटनेची 14 वी वार्षिक मीटिंग सुवर्णा थोरात यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या मीटिंग मधे एकंदर 8 विषयावर चर्चा करण्यात आली.राज्य आरोग्य आशा व गट प्रवर्तक सलग्न आय टक चे राज्य अधिवेशन गोंदिया येथे 26 व 27 एप्रिल 2025 रोजी असून त्या मध्ये प्रतिनिधी पाठविण्याचे ठरले. आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांचे कामावर आधारित मोबदला तसेच स्टेट फंड व केंद्र फंड दरमहा मिळत नसून 2 ते 3 महिने पेमेंट केले जात नाही.त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला असून या बाबत तीव्र लढा उभारण्याचे ठरले.
यावेळी संघटनेचे ऍड.सुधीर टोकेकर यांनी सर्व विषय व कामकाज संभादित सर्व विषयावर चर्चा घडवून आणली.यावेळी 2025 साठी पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्ष,कार्याध्यक्ष,व जिल्हा सेक्रेटरी पदी अनुक्रमे ऍड कॉम.सुभाष लांडे , कॉ.सुरेश पानसरे व ऍड कॉमरेड सुधीर टोकेकर यांची निवड झाली.
उपाध्यक्ष म्हणून नाजीया पठाण ,सविता धापटकर,यमुना दळवी,तर सह सेक्रेटरी पदी आशा देशमुख,सौ.शोभा गायकवाड, राखीपुरोहित तर खजिनदार पदी स्मिता ठोंबरे, कार्यकारिणी सदस्य म्हणून शारदा काळे, स्वाती भणगे,आशा बाळासाहेब मगर,प्रतिभा काटमोरे,
जिल्हा मार्गदर्शक म्हणून सुवर्णा थोरात,तर जिल्हा संघटक म्हणून उषा अंडांगळे यांची निवड झाली.यावेळी बोलताना जिल्हा सेक्रेटरी यांनी सांगितले की आशा वर्कर यांचे जिल्हाभर स्थानिक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी एक निवेदन देवून चर्चा करावी अशी विनंती केली जाणार असून त्याची दखल न घेतल्यास प्रचंड आशा मोर्चा झेड पी वर नेण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला.

