त्या भोवती चालणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी दिले निवेदन
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील बहुजन भीम पँथर सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माहेगाव देशमुख येथील नवनाथ पांडुरंग वाघ सामाजिक कार्यकर्ते यांनी कोपरगाव तालुक्यातील काही अंगणवाड्या वाडी वस्तीवर आहे त्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या नजदीक आवारात आणण्यात याव्यात नाहीतर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती विभाग कोपरगाव व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे. व तसेच काही अंगणवाडी शिवारात काही अंतरावर अवैध धंदे चालू आहे तेही तालुका पोलीस प्रशासनांनी कारवाई करून बंद करण्यात यावे. व अंगणवाडीतील पाण्याची आर्थिक टंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो व वाढत्या तापमानाच्या त्रिवतेमुळे मुलांना उष्माघात होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक अंगणवाडीमध्ये मुलांसाठी फॅन ची व्यवस्था करण्यात यावी व तसेच या तापमानामुळे काही काळ अंगणवाडीतील लहान मुलांच्या शाळेचे वेळ ही 9ते 11 या दरम्यान उपलब्ध करून द्यावे जेणेकरून मुलांना वाढत्या उन्हापासून काहीही त्रास होणार नाही यासाठी बहुजन भीम पॅंथर सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पांडुरंग वाघ यांनी निवेदन पत्र दिले.

