सर्पेवाडा येथील जि. प. शाळेत इको फ्रेंडली होळी साजरी

0
157

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा- तालुक्यातील कोका (जंगल) केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सर्पेवाडा येथे इको फ्रेंडली होळी व खेळा होळी इको फ्रेंडली कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास दिघोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण दूत विलास केजरकर, शिक्षक रत्नदीप घोडगे, कु. मिना रामटेके, अंगणवाडी सेविका पौर्णिमा चव्हाण, इंदुताई ढोमणे, अंगणवाडी मदतनीस कु. काजल चव्हाण, शंकर सिरसाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात स्वच्छता अभियान राबवून (केरकचरा) पालापाचोळा गोळा करून पूजाअर्चा व प्रसाद अर्पण करून केर कचऱ्याचे इको फ्रेंडली होळी पटवून होळी सभोवताल रिंगणात नाचत, गाणी गात इको फ्रेंडली होळी पटवून आनंद व्यक्त करण्यात आला.

मानव जसा आधुनिक झाला तसेच सणे सुद्धा आधुनिक होऊन निसर्गविरोधी झाले. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणपूरक जीवन शैलीचा वापर करावा. मानव व होळी ला वृक्षांचे महत्त्व तसेच आजचे विद्यार्थी विद्यार्थिनींना भारतीय सणांची व्हावी असे मार्गदर्शन पर्यावरण दूत विलास केजरकर व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक विलास दिघोरे यांनी इको फ्रेंडली, ग्रीन होळी सणाच्या निमित्ताने मौलिक मार्गदर्शन केले.
त्यानंतर स्थानिक परिसरात स्वच्छता अभियान राबवून केरकचरा जमा करण्यात आला. केरकचऱ्याचे प्रज्वलन सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते केल्यावर पर्यावरणस्नेही कार्यक्रमाचे उद्घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रत्नदीप घोडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मीना रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दुर्गेश्वरी पंधरे, पुजा कोबडे, स्विनल रामटेके, यश रेहपाडे, लावण्य डोंगरे, नैतिक वरठे, दिपांशु मानकर, सोहम वरकडे, प्राची रोडगे, दिपाली बरडे, समर डोंगरे, श्रावणी मेश्राम, आस्था भालेराव, स्वराली टेटे, आर्यन भालेराव, साक्य डोंगरे, नैतिक वरठे, रेहांश डोंगरे, ओमकार पेंदाम, यश रेहपाडे व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here