केक कापून वर्धापन दिन साजरा
बहारदार काव्यमैफिल रंगली.
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका : कवी कट्टा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर देश आणि जगामध्ये पोहोचलेली साहित्यिक ऑनलाइन चळवळ कवी कट्टा या समूहाचा 12 मार्च रोजी दहावा वर्धापन दिन विसावा गार्डन या उद्यानात केक कापून उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक अनुरत्न वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय बोधणे,कवयित्री बालिका बरगळ,कवी नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती.
या कवी संमेलनात अनेक कवी कवयित्रींनी सहभाग घेतला..तर कवी कट्टा समूहाची 16 फेब्रुवारी रोजी निसर्ग सहल जांभूळ बेट या ठिकाणी गेली होती. या सहलीचे वृतांकन करणाऱ्या लेखांची स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक कवी लेखक मा.शंकर माने यांच्या वृतांकनाला मिळाला, तर द्वितीय क्रमांक प्रसिद्ध कवयित्री लेखिका रूचिरा बेटकर यांना तर तृतीय क्रमांक पवनकुमार कुसुंदल यांच्या वृतांकन लेखनाला मिळाला. या सर्व विजेत्यांचे या कवी संमेलनात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.तसेच या सहलीत ‘तळ्यात मळ्यात’ हा खेळ खेळण्यात आला होता.यात लहान मुलांना विजेते घोषण करण्यात आले होते. त्यांचाही सत्कार सन्मान या ठिकाणी करण्यात आला.
कवी कट्टा समूहाने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात 16000 साहित्यिक जोडले असून ऑनलाईन विविध उपक्रमांनी कवी कट्टा महाराष्ट्रभर परिचित आणि सर्व दूर पोहोचला आहे. कवी कट्ट्याचे विविध ऑनलाईन आणि प्रत्यक्ष कार्यक्रम हे सर्वांना आवडलेले असून हा एक लोकप्रिय आणि सबंध जगभर पसरलेला साहित्यिक समूह आहे. कवी कट्टाच्या वर्धापन दिनानिमित्त सबंध जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. तसेच विसावा उद्यान येथे पार पडलेल्या कविसंमेलनात अनेक कवींनी सहभाग घेतला. त्यात गोदावरी गायकवाड,उषा ठाकूर, रूपाली वागरे,आदित्य गव्हाणकर, सुरेश बामणीकर, आई मायेचा सागर.. या कवितेचे कवी गंगाधर हरणे आदी अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री ज्योती गायकवाड यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आयोजन कवी कट्टाचे संचालक अशोक कुबडे आणि दत्ता वंजे यांनी केले..
येणाऱ्या काळात कवी कट्टा अनेक उपक्रम घेऊन येणार असल्याचे कवी कट्टा समूहाचे संचालक अशोक कुबडे यांनी प्रास्ताविकात यावेळी सांगितले. तर या कार्यक्रमाचे आभार दत्ता वंजे यांनी मानले..

