कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे 7744022677
कोपरगाव तालुक्यात रवंदे गावातील अतिक्रमण हटविण्यात आले त्यात शासकीय भूखंडावरील अतिक्रमण धारकांची समस्या समजून न घेता गोर गरीब लोकांची संसार उद्धवस्त केले आहे. त्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. ज्याच्या जीवावर मतदान घेऊन दारोदारी हिंडून मत मागणारे लोकप्रतिनिधी झोपले का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील यांनी केला आहे केवळ गरीबांची दिशाभूल करणारी यंत्रणा गोर गरीब पासुन ते श्रीमंत लोकांना भारतीय संविधानाने समान अधिकार दिला असुन त्यात गोर गरीब आदिवासी कुटूबाचे नुकसान होऊन लहान मुलांना उन्हात घेऊन तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली आहे
एकलव्य संघटना हे आंदोलन करीत असुन आमचा जाहीर पाठिंबा असुन कोपरगाव चे लोकप्रतिनिधी यांच्या वर गोर गरीब मतदारांचे उपकार आहेत त्यांची परतफेड पुनर्वसन करून करावी म्हणजे विकास पुरूष आहे लोकप्रतिनिधी असं म्हणता येईल नाहीतर सक्षम नेतृत्व या मतदारसंघात नाही असा सवाल केला आहे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील यांनी पञकार प्रसिद्ध साठी दिली आहे

