कायद्याच्या दणक्याने महसूल आयुक्त जागेवर या नगरच्या महसुल आधिकाऱ्यांना तटस्थ कारवाईचे आदेश
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख
मो. 7620208180,9860910063 – कोपरगाव तालुक्यामध्ये अवेद्य वाळू तस्करी, अवैद्य धंदे, चोऱ्या माऱ्या ,दरोडे, खून बलात्कार ,छेडछाड, दमबाजी सामान्यांना दांगट शाहीकडून होणारा त्रास या विरोधात काल माननीय नाशिक आयुक्त प्रवीण कुमार गेडाम यांच्या कार्यालय समोर एकलव्य आदिवासी परिषद या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ औताडे यांच्या शिष्टमंडळाने 10 तास उपोषण केले तसेच निवेदनामध्ये सांगितले गेले की या अवैद्य धंद्यामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहे,लहान मुलीचा संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे, मायगाव देवी परिसरामध्ये एका लिलावाच्या गाडी चालकाने चक्क एका लहान मुलीला शेड काढण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे, लहान युवक, व्यसनाधीष्ट होत आहे, तसेच कोपरगाव तालुक्यात हिंदू समाजाचे पवित्र गोदावरी नदीपात्रातून आजपर्यंत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अवैध उत्खनन केले व आमफ माया कमावली व हीच लोक तालुक्यात दहशत माजवत आहे,
तसेच आजपर्यंत मायगाव देवी, सुरेगाव, माहेगाव देशमुख येथे शासकीय डेपो लिलावाच्या नावाखाली आज पर्यंत जो अवैद्य वाळू उपसा केला गेला आहे या संदर्भात लवकरच लेखी अहवाल
सादर करावा असं देखील निवेदनात म्हटले आहे अन्यथा कारवाई होईपर्यंत माननीय प्रवीण कुमार गेडाम यांच्या कार्यालय समोर येत्या पंधरा दिवसात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश औताडे यांनी दिला आहे, तसेच यावेळी निवेदनात आई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भोसले म्हणाले की निलावाच्या नियम प्रणालीमध्ये स्पष्ट आहे की लिलाव हद्दीत जर कोणी अवैधरित्या वाळू उत्खनन केले असेल त्यास वर एम पी डी मोकासारखा गुन्हा दाखल करावा परंतु महसूल अधिकारी अद्याप अशी कारवाई करताना कुठे दिसत नाही यासंदर्भात देखील लवकरच वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल केले जातील असे विनोद भोसले म्हणाले! तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना दमाबाजी, जीवे मारण्याची धमकी असे अनेक प्रकार उघडकीस येत असेल तर अशा वाळू तस्करांवर देखील संघटित गुन्हेगारी व कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन महसूल आयुक्त प्रवीण कुमार गेडाम यांच्या निदर्शनाखाली माननीय अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले ! तसेच अहमदनगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी वाळू माफियांवर, ठेका धारक यांच्या वर कारवाई करत नसेल तर महसूल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी लागेल तसेच अवैध धंद्याबाबत वारंवार तक्रारी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयत येऊ लागल्या तर वेगळ्या पद्धतीने कारवाईसाठी पाऊल उचलावे लागेल असे देखील अप्पर आयुक्त वाघ म्हणाले!

