प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : येथील जगन्नाथ बाबा नगर येते स्थित असलेली ज्ञानार्चना अपंगस्नेह बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित दिव्यांग महिलाश्रयाच्या आर्थिक सहकार्याकरीता अंध विद्यालय अमरावती द्वारा प्रस्तुत सुर संगम ऑर्केस्ट्राचे आयोजन दिनांक 22 मार्च 2025 रोजी शनिवारला सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर करण्यात आलेले आहे. संगीत हे जीवनच अंग आहे, आनंद आहे. हाच आनंद या कार्यक्रमास आपण सर्व चंद्रपूरवासी उपस्थित राहून घ्यावा. असे आवाहन ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरच्या संस्थापिका अध्यक्षा अर्चना मानलवार भोयर यांनी केले आहे. ज्ञानार्चना ही संस्था मागील ८ वर्षापासून आपल्या अनेक अनाथ, बेघर, असहाय्य दिव्यांग मुलींना दिव्यांग महिलाश्रयाच्या माध्यमातून मोफत निवासी व्यवस्था देत आहे तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्याकरिता विविध प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. या दिव्यांग महिलाश्रयाच्या आर्थिक मदतीकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी पास काढून हा कार्यक्रम अवश्य बघावा. पासेस करिता 7588806081/8421636554 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आयोजकांनी सर्वांना विनंती केलेली आहे.

