प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर – शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर स्थापित (९ ऑगस्ट १९८९) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रेरणा मेळावे आयोजित होत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा चंद्रपूरचे वतीने जिल्हा प्रेरणा मेळावा रविवार दिनांक २३ मार्च २०२५ ला मातोश्री विद्यालय ताडोबा रोड तुकूम, चंद्रपूर येथे दुपारी १ वाजता गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मा. सुर्यकांत खनके यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत दुपारी १ ते ४ या कालावधीत संपन्न होणार आहे. या मेळाव्यात समितीची पंचसूत्री, पुरोगामी संत व समाजसुधारक यांचे विज्ञाननिष्ठ विवेकी विचारांवर आधारित राबविण्यात येणारे विविध उपक्रम व तथाकथित चमत्कारांचे सादरीकरण इत्यादी विषयांवर प्रबोधन होणार आहे. तरी या प्रबोधन कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रत्येक शाखेचे पदाधिकारी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे वाचक, समितीचे हितचिंतक, जे ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यात समितीचे सदस्य बनले तसेच ज्यांना या समितीमध्ये काम करण्याची ईच्छा आहे अशा सर्वांनी या प्रेरणा मेळाव्यातील अंधश्रद्धा निर्मूलन विषयक वैचारिक प्रबोधनाचा लाभ घेण्यासाठी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे. या प्रसंगी दोन वर्ष कालावधीसाठी चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात येईल. या जिल्हा मेळाव्याची नोदणी पी एम जाधव 9423117678, नारायण चव्हाण 8806031281 या मोबाईल क्रमांकावर करावी ही विनंती असे देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष महा अंनिस यांनी कळविले आहे.

