मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांशी संबंधित विकास योजनांवर सविस्तर चर्चा झाली.
गडचिरोली जिल्ह्यातील उद्भवणाऱ्या समस्या आणि आदिवासी विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शनात्मक चर्चा करण्यात आले.. यावेळी आमदार डाँ.मिलिंद नरोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार,सहकार आघाडी प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे,आदिवासी प्रदेश मिडिया सेलचे प्रमुख अक्षय उईके यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या संवादातून गडचिरोलीच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

