महिला कैद्यांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रम

0
103

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर इनरव्हील क्लबच्या वतीने कारागृहातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंधरा दिवसांचे सर्टिफाईड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १७ मार्च रोजी सुरू होऊन ३० मार्च रोजी संपणार आहे. या उपक्रमात एकूण ४० महिला प्रशिक्षण घेत आहेत.

प्रशिक्षणार्थी अवंती कासनगोटूवार आणि इनरव्हील सदस्य किर्ती पेशेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जात आहे. या कार्यक्रमाला क्लब अध्यक्ष सुचिता जेऊरकर, सदस्य कविता झाडे, श्वेता मस्के, वैशाली अडकिने आणि अलका चांदेकर उपस्थित होत्या.

हे कारागृहातील महिलांसाठी इनरव्हील क्लबचे दुसरे प्रशिक्षण सत्र आहे. या उपक्रमासाठी कारागृह शिक्षक हातवारे सरांचे सहकार्य लाभले असून ठाणेदार सोनवणे सरांची अधिकृत परवानगी घेऊन हा उपक्रम राबवला जात आहे. महिलांना त्यांच्या शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आत्मनिर्भर होण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here