कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 7620208180,9860910063
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये स्कूल व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदा कडून लहान चिमूरड्यांचा नाच गाणे कॉमेडी नाटक संपूर्ण रामायण देखावा माझी लाडाची बायको ने उपवास धरला अशा विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरस्वती देवी, आदी महापुरुष यांचे कार्यक्रमा चे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले. आलेल्या मान्यवारांचे सत्कार समारंभ जिल्हा परिषद शाळा मायगाव देवी, शिक्षक वृंद, व शालेय व्यवस्थापण समिती यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचे विध्यार्थी यांना प्रबोधन पर भाषणे झाली व लगेच जल्लोष चिमुकल्यांचा या कार्यक्रमास सुरुवात झाली.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महानंदा डेअरीचे माजी संचालक राजेंद्र बापू जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापण सचिव इरोळे सर हे होते. आजच्या कार्यक्रमाला मायगाव देवीचे सरपंच दिलीप शेलार, उपसरपंच मुकुंद गाडे , सदस्य बाबाकाका गाडे , सदस्य सुभाष साबळे, ग्रामस्थ सुखदेव गडाख, बापू गाडे,बाबासाहेब गाडे,भगवान गाडे, अशोक कदम, राजेंद्र गाडे, राजेंद्र नाजगड,डॉ. मोहित गाडे, दिगंबर गाडे, रामराव गाडे, सर्व ग्रामस्थ, बंधू आणि भगिनीं मोठया संख्येने उपस्तित होते.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष प्रसाद बैरागी, उपाध्यक्ष आबासाहेब साबळे, सदस्य श्रीकांत गाडे, दिलीप गाडे, सचिन गाडे, सुदाम पेंढारे, गोविंद ढोमसे, वासिम शेख, साईनाथ शेलार, नितीन मोकळ, यांनी व मुख्याध्यापक प्रमिला वैद्य मॅडम,सोनावणे सर, संजय वाणीसर,कचरे सर आदि मान्यवरानी चांगल्या पद्धतीने केले

