prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने

0
117

शब्द शब्द सजवतात
ओळी कवितेच्या
वाटा मोकळ्या करतात
मनातल्या कवीच्या

मनातली सल
सांगता येत नाही कुणाला
तेव्हा शब्द येतात धावून
कवयित्रीच्या मदतीला

बनते एक सुंदर रचना
तिलाच म्हणतात कविता
कायमस्वरूपी हृदयात
संगीत देते कविता

कवी शब्दांचा जादूगर
शब्दांची किमया करतो भारी
रचतो अभंग, भक्तीगीते, गाणी
गझल, चारोळी अन् लावणी

दिवस आणि रात्र
समान तासाचा
एकवीस मार्च
हा दिवस भाग्याचा
अन् जागतिक कवितेचा

रेखा डायस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here