वेडे मन बावरते
प्रीत तुझी आठवून
मनी माझ्या लाज येते
स्पर्श तुझा आठवून।।१।।
कसे गुंतले मन हे
नाही कधी समजले
खरे होते की भास ते
नाही आज उमगले।।२।।
घेता हातात हात तू
प्रीत ती फुलत गेली
कळ्या उमलून साऱ्या
धरती सुगंधी झाली।।३।।
भास तुझा भोवताली
मन हे बेभान होते
सूर जुळता हळूच
गाणेही जुळून येते।।४।।
भाव नयनात माझ्या
खेळ पापणीचा चाले
प्रीत हृदयात बोलकी
ओठ नकळत हाले।।५।।
धागा जुळता मनाचा
प्रीत बोलकी झाली
वेड्या माझ्या या मनात
प्रीत बहरून आली।।६।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर


सुंदर
tx sir