पोभुर्णा येथे तिन दिवसीय समता सैनिक शिबिर लिबुनी बुद्ध विहार पोभुर्णा येथे महेद्र उराडे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष यांनी समता सैनिक दलाचे शिबिराचे उद्घाटन व ध्वजारोहण केले तसेच सिन्देवाही तालुक्यातील मोहाळी, गडबोरी, रत्नापुर येथे महिलांचा धम्म उपाशीका शिबिराचे उद्घाटन मोहाळी येथील आद मनसराम साहरे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमन निमगडे ह्या होत्या , गडबोरी येथील महिला धम्म उपाशिका शिबिराचे उद्घाटन सुजाताताई लाटकर यांनी केले.
रत्नापुर येथील महिला धम्म उपाशिका शिबिराचे उद्घाटन आद विजया रामटेके तर अध्यक्ष म्हणून आद मिनाक्षी बारसागडे यांनी स्विकारले तर श्रामणेर शिबिराचे उद्घाटन डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आद रमेश मानकर उपाध्यक्ष संस्कार यांनी स्विकारले.
आदर्शाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील देउन करण्यात आली व श्रामणेराना श्रामणेराची दिक्षा देऊन चिवर देण्यात आले.

